रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

राजाधिराज पाचवे जॉर्ज

श्रीमत् राजाधिराज पाचवे जॉर्ज हिंदुस्थानचे
बादशहा यांच्या राज्यारोहणानिमित्त पदे
( अभिवादन करीत)
अभिनंदन करीतो प्रांजली । मंगल काली॥ धृ॥
प्रजाजनांच्या मंगल वचनी ॥ वाद्ये वाजति सकलहि भुवनी ॥
शुभलग्नी सुमनोहरांनी ॥ श्री वसुंधरा तुज वरुनी ॥ पावन झाली॥1॥
पितामहीसम अमरसुखाते॥ सेवि भूवरी त्रिभुवननृपते॥
जी शोभा दे तव जनकातें। शांत वृत्तिला त्या हाते॥ बसवी भाली॥
क्षमादयागण किरणी रमवी। सदाही भूपा वसुधा देवी॥
जन सारे सदया करि तेवी। तव कृपाचंद्रिकाजाली॥ वैभवशाली॥

(दावर दादार)
विनती नाहिं इतर कांही, सदाहि स्वजनकसम तूंहि पाहिं नाटयकलानिरत जनां
कृपेक्षणांही॥धृ॥  कुंठित गति होति न जरि नृपकरिं ॥ ललितकला सकला॥
भूपाल तरि तयाला॥ द्रुततर गति वितरुनि अति पसरवि यश दशदिशांही॥1॥ चंद्रबिंब
कांति पसरि जगभरि ॥ तिमिर जी निवारी॥ होई न तापकरी॥ शमधन जनिं उधळि सतत
तदमृतकण निजकरांही॥2॥

-    २२ जून १९११, पुणे.