रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

सगुण स्वरुप

सगुण स्वरुप

(पंढरीस पांडुरंगाची पायभेटी झाली त्या वेळी या चार पाकळया अर्पण केल्या होत्या.)
(चालः नाहि सुभद्रा या वार्तेते)
धन्य पंढरी ! धन्य भीवरा ! धन्य चंद्रभागा !
भक्तांसांठी वैकुंठीचा नाथ जिथे जागा ॥धृ॥

स्वानंदाचा गाभा, शोभा ब्रह्ममंडळाची।
वैरागरिचे रत्न मनोहर, आशा पुण्यांची॥
कैवल्याचें निधान केवळ, माता संतांची ।
तो प्रभु झाला सगुण सांवळा गोकुळिंच्या रंगा॥धन्य.॥1॥

भक्तराज तो पुंडलीक या जगी एक जाणा।
हांक जयाची ऐकुनि धावे लक्ष्मीचा राणा॥
करावयास्तव जगत्रयाच्या अखंड कल्याणा।
कटि कर, समपद, विटेवरी करि उभा पांडुरंगा॥धन्य.॥2॥

स्वच्छंदे सच्चिदानंदपद रमे वाळवंटी।
'जय जय विठ्ठल' नाद एक हा संतांच्या कंठी॥
पहावया स्वानंदेसोहळा सुर करिती दाटी।
'पुडंलीकवरदा हरि विठ्ठल' रंगवी दिग्भागा॥धन्य.॥

१९०८. महाद्वार पंढरी.