रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

अर्पण पत्रिका

सत् --
चित्-हृत्-महत्
आनंद-पदवी-प्रदान-वदान्या ॥1॥
प्रीतीची पवित्रता, चिरंतनाची चरित्रता,
सृष्टीची सचित्रता,
विश्वाची विविधता, अनंताची अगाधता,
ईश्वराचे अस्तित्व
या सर्वांच्या
अचल ऐक्याची
प्रत्यक्ष निदर्शना ॥2॥

भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा,
भवितव्यांतली भाग्यदेवी ॥3॥
हृदयाची स्फू र्ति, इच्छेची पूर्ति,
मांगल्याची किर्ति
श्री हृदयशारदा
ही
सर्वस्वाने अर्पिलेली
'वाग्वैजयंती' सदैव कंठांत धारण करो !
'गोविंदाग्रज'