मंगळवार, एप्रिल 25, 2017
   
Text Size

लग्न मोडण्याची कारणे

''आता एकच विचार, कोणी नवरा  त्याशी समर्पू म्हणे।''

मानवी बुध्दीच्या आटोक्यात येणार्‍या कोणत्याही विषयाच्या ज्ञानाची, सामान्यत: तात्त्वि (Theoretical) व व्यावहारिक (Practical) अशी दोन अंगे असतात. यापैकी कोणत्याही एकाचाच परिचय होऊन भागत नाही. त्यापैकी कोणतेही एक दुसर्‍यावाचून भटकताना दिसले, म्हणजे विरहावस्थेतील प्रणयीजनाप्रमाणे बेवकूब ठरून ते उपहासाला पात्र होते. पहिल्याला 'पुस्तकी विद्या' हे नाव मिळून दुसर्‍याची आडमुठेपणात जमा होते. 'बारीक तांदूळ तितके चांगले' हे पुस्तकी सूत्र पाठ म्हणणारा पक्वपंडित व्यावहारिक ज्ञानाच्या अभावी, बारकातले बारीक तांदूळ म्हणून कण्याच घेऊन घरी येतो! पोहण्याच्या पुस्तकातील नियम हृदयात साठवून, समोर मोठया मेजावर ठेवलेल्या बशीभर पाण्यातल्या बेडकाबरहुकूम हातपाय पाखडणारा तितीर्षु बारा वर्षे असे अध्ययन करूनही शेवटी स्नान करताना झोक जाऊन बालडीभर पाण्यात बुडून मेल्यास नवल नाही! चोवीस वर्षाच्या एका नवरदेवाऐवजी बारबारा वर्षाचे दोन विचवे चालतील किंवा नाही, ही शंका काढणारे डोकेही केवळ एकांगी ज्ञानानेच एकीकडे कलते झाले असले पाहिजे. उलटपक्षी, संथपणे चाकूने पोट चिरून, वाढलेली पानथरी वेताची कापून पुन्हा जागच्या जागी चिकटवून चांगल्या लडीच्या दोर्‍याने पोट शिवून जसेच्या तसे आगबंद केले असताही रोगी मेल्याबद्दल आश्चर्यचकित होणारा नाकाडोळयाचा वैदू तात्त्वि ज्ञानाचे अज्ञान दाखवितो. तात्पर्य, ज्ञानाच्या या दोन्ही बाजू मनुष्याला अवगत असल्याखेरीज कोणत्याही बाबतीत त्याची खरी वाहवा होत नाही; आणि याच कारणामुळे, पहिल्या लेखांकात वरसंशोधनाचे तात्त्वि ज्ञान वाचकांपुढे ठेवून, मागील खेपेला कबूल केल्याप्रमाणे प्रस्तुत ज्ञानाची व्यवहारात अंमलबजावणी कशी होते, हे सांगण्याचा मनसुबा आहे.

पुढे वाचा: लग्न मोडण्याची कारणे